मुंबई : एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित असला तरीही भाजपमधील हालचाली थांबलेल्या नाहीत, आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची बातमी स्वतः एकनाथ खडसे यांनी दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याची घोषणा केली होती. पण आता यावर भाजपकडून प्रतिक्रिया येत आहेत.
कोणता आमदार राजकीय भवितव्याची आत्महत्या करेल? सध्या भाजपचा एकही आमदार एकनाथ खडसेंच्या संपर्कात नाही. ते कालपर्यंत पक्षात होते, त्यामुळे आमदार संपर्कात होते. फडणवीस कसे काम करतात हे माहिती असताना इतर आमदार त्यांच्यासारखी राजकीय भवितव्याची आत्महत्या का करेल, असा सवाल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
एकनाथ खडसेंनी भाजपमधील 10 ते 12 आमदार माझ्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. याबाबत प्रवीण दरेकरांनी विचारले असता त्यांनी खडसेंवर टीका केली. भाजपाचा एकही आमदार खडसेंच्या संपर्कात नाही. कालपर्यंत ते पक्षात होते म्हणून आमदार त्यांच्या संपर्कात होते. भाजपाचे भविष्य सर्वांना माहित आहे. दीर्घकाळ नेतृत्व करणारा एवढा मोठा पक्ष आहे. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस काम कसे करत आहेत हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे इतर कोणता आमदार त्यांच्यासारखी राजकीय भवितव्याची आत्महत्या करेल, असा सवाल प्रवीण दरेकरांनी विचारला.
तसेच पहाटेचा शपथविधीबाबत नैतिकता आणि राष्ट्रवादीत गेले की अनैतिकता असे खडसे म्हणाले होते. आता ते त्याच राष्ट्रवादीत गेलेत ना, याबाबत फडणवीसांची बदनामी आम्ही भोगली आहे. राष्ट्रवादीतून शरद पवार खडसेंवर तोडपाणी करणारा नेता म्हणून आरोप करतच होते. त्यामुळे त्यांच्या पक्षात जाऊन त्यांनी नैतिकतेच्या गोष्टी करुन नयेत. त्यांना शुभेच्छा, नांदा सौख्य भरे अशा शब्दात प्रविण दरेकरांनी खडसेंवर टीका केली.
Read Also :
शरद पवार असं उगाच कोणाला प्रवेश देणार नाहीत,खडसेंच्या प्रवेशानंतर शिवसेना नेत्याने दिली प्रतिक्रिया https://t.co/2wwRwc7TZb#SharadPAwar #Eknathkhadase #NCP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 22, 2020