कोल्हापूर: कोल्हापुर जिल्हा दूध उत्पादक संघ – गोकुळ Kolhapur District Milk Producers Association – Gokul Milk निवडणुकीत गेली तीस वर्षे असलेली महादेवराव महाडिकांची सत्ता उलथवून टाकण्यात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना यश आले आहे . सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जोडीने महादेवराव महाडिक आणि आमदार पी . एन . पाटील यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवला. सतेज पाटील यांच्या पॅनेलने 21 पैकी 17 जागा जिंकल्या तर महाडिकांच्या सत्ताधारी पॅनेलला केवळ 4 जागा मिळाल्या. माजी आमदार सुजित मिणचेकर, अमर पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर ( शेतकरी आघाडी ) शौमिका महाडिक (महाडिक पॅनेल) हे राखीव गटांतून विजयी झाले.
गोकुळ हा तसा सर्वसामान्य शेतकरी आणि दूध उत्पादकांचा संघ मात्र आता गोकुळचे राजकीय आणि आर्थिक व्याख्या बददली आहे. या निवडणुकीदरम्यान तब्ब्ल १०० कोटींची उलाढाल झाली. एक ठरवधारकाला तब्ब्ल १५ लक्ष एवढा भाव फुटला होता. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये देखील मात्तबर राजकारणी असणाऱ्या आणि आर्थिक रित्या मजबूत असणाऱ्या संचालकांचाच विजय झाला आहे. अत्यंत कमी संचालक आहेत जे कार्यकर्ते आहते आणि गरीब घरातील आहेत. बंटी पाटलांनी सत्तांतर जरी केले असले तरी देखील घराणेशाहीला चाप बसवण्यास ते कमी पडले आहे. गोकुळ च्या रणांगणात सोयीचे राजकारण बघायला मिळाले असे म्हणायला हरकत नाहीये.
सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या (राजर्षी शाहू शेतकरी आघाडी) पॅनलचे गोकुळचे नवीन संचालक मंडळ Gokul’s new board of directors of Satej alias Bunty Patil’s (Rajarshi Shahu Shetkari Aghadi) panel
डोंगळे अरुण गणपतराव (राजर्षी शाहू शेतकरी आघाडी), नरके अजित शशिकांत (राजर्षी शाहू शेतकरी आघाडी) , तायशेटे अभिजीत प्रभाकर(राजर्षी शाहू शेतकरी आघाडी), नविद हसन मुश्रीफ (राजर्षी शाहू शेतकरी आघाडी), पाटील चुयेकर शशिकांत आनंदराव (राजर्षी शाहू शेतकरी आघाडी), पाटील आबाजी उर्फ विश्वासराव नारायण (राजर्षी शाहू शेतकरी आघाडी) , चौगले किसन बापूसो (राजर्षी शाहू शेतकरी आघाडी), पाटील रणजितसिंह कृष्णराव(राजर्षी शाहू शेतकरी आघाडी), ढेंगे नंदकुमार सखाराम (राजर्षी शाहू शेतकरी आघाडी), गायकवाड कर्णसिंह संजयसिंह (राजर्षी शाहू शेतकरी आघाडी), चौगले बाबासाहेब श्रीपती (राजर्षी शाहू शेतकरी आघाडी), घाटगे अंबरिषसिंह संजय (राजर्षी शाहू आघाडी , महाडिक पॅनेल ) खाडे बाळासो उर्फ वसंत नानू (राजर्षी शाहू आघाडी, महाडिक पॅनेल), नरके चेतन अरुण (राजर्षी शाहू आघाडी , महाडिक पॅनेल) पाटील संभाजी रंगराव (राजर्षी शाहू शेतकरी आघाडी) हे सर्व गोकुळच्या संचालक पदी निवडून आले आहेत.
दिग्ग्ज नेत्यांचे वारस झाले गोकुळचे संचालक
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ , जेष्ठ संचालक आणि गोकुळ ची सत्ता अनेक वर्ष भोगणारे अरुण नरके यांचे चिरंजीव चेतन नरके , माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके , माजी आमदार के . पी . पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह पाटील , माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे चिरंजीव कर्णसिंह गायकवाड , माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे चिरंजीव अमरसिंहपाटील , माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक ,माजी आमदार सूचित मिणचेकर यांना गोकुळमध्ये संचालकपदाची संधी मिळाली आहे .
बंटी पाटील ,आमदार प्रकाश अबिटकरांनी कार्यकर्ते केले मोठे
आमदार प्रकाश अबिटकरांनि त्यांचे सर्वसामान्य कार्यकर्ते नंदकुमार ढेंगे,अभिजित तायशेटे यांना गोकुळ मध्ये जाण्याची संधी दिली आणि त्यांना चांगल्या मतांनी निवडून देखील आणले.सतेज उर्फ बंटी पाटील यांनी देखील त्यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता बायजी शेळके याला उमेदवारी करण्याची संधी दिली आणि त्यांना मोठ्या मताने निवडून देखील आणले. बायजी शेळके यांनी निवडून आल्यानंतर बंटी पाटलांवरील निष्ठेचे फळ मला मिळाले आहे असे म्हणत आनंदाश्रू वाहिले आणि नंतर गुलाल घेतला.