कोरोनामुळे अनेक प्रकारच्या व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने सिनेमा चित्रीकरणाला परवानगी दिली मात्र सिनेमागृह अद्याप बंदच आहे. त्यामुळे सिंगल स्क्रीन असलेल्या थिएटर्स मालकांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली आहे.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सर्व थिएटर्स बंद आहेत, यामुळे राज्यातील सिंगल स्क्रिन थियटरचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. थिएटर पुन्हा सुरु करावीत या मागणीचे निवेदन सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष व फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष नितीन दातार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिले आहे. यामध्ये सिंगल स्क्रिन थियटरचालकांच्या विविध मागण्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंगल स्क्रिन थिएटरचालकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा, अशी विनंती सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर एकपडदा थिएटर्स बंद आहेत.यामुळे राज्यातील एकपडदा थियटरचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. ती पुन्हा सुरु करावीत या मागणीचे निवेदन
सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष व फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष नितीन दातार यांनी दिले आहे. pic.twitter.com/8TBi3sjkuN— Supriya Sule (@supriya_sule) August 25, 2020
राज्य सरकारने चित्रीकरणाला परवागनी दिल्यानंतर आता विविध मालिकांचे व चित्रपटांचे शुटींग सुरू झाले आहे. मात्र, सिनेमागृह आणि मल्टीप्लेक्स थेअटर बंदच आहेत. त्यातच, सप्टेंबर महिन्यातही लॉकडाऊन कायम ठेवण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. त्यामुळे, चित्रपट, थिएटरमालक आणि तमाशा कलावंतांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.