येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या भूमीपूजन सोहळ्याबाबत आज सांगली मध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रभू राम अतुलनीय, पूज्यनीय पुरुष दैवत होते. पण आतापर्यंतच्या फोटोंमध्ये राम-लक्ष्मणाला मिशा नव्हत्या. आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्याला राम फोटोमध्ये दाखवले गेले. निदान अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या रामाच्या मंदिराच्या मूर्तीमध्ये तर मिशा असाव्यात, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अयोध्येमधील राममंदिर समितीला केली आहे.
500 वर्षांपासून अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न सुरु होता आणि आता तो साकारला जात आहे. देशातील तमाम हिंदू समाजासाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळे देशातील हिंदू समाजाने सध्या कोरोनाची परिस्थिती असली तरी कोरोनाला न घाबरता दिवाळी आणि दसऱ्याप्रमाणे हा सोहळा साजरा करावा. असे आवाहन देखी संभाजी भिडे यांनी केले आहे.