पुणे : नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या गादीवर बसवून भांडवलदार राज्य करीत आहेत, अशा शब्दात राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. एका कार्यक्रमात पुणे शहर काँग्रेस कमिटीला संबोधित करताना ते बोलत होते.
राजेशाहीच्या काळात एखाद्या वारसाला वा दत्तकाला गादीवर बसवून राज्य कारभार चालवला जायचा. तसेच सध्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या गादीवर बसवून भांडवलदार राज्य करीत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
देशातील तमाम धर्मनिरपेक्ष, समता व लोकशाही मूल्य जपणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन नवपेशवाईचे समूळ उच्चाटन करावे, असे आवाहन देखील राऊत यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित असलेले हिंदूराष्ट्र म्हणजे भांडवलदारांच्या नफेखोरीसाठीचे राष्ट्र असे म्हणावे लागेल, असे म्हणत त्यांनी संघावर देखील निशाणा साधला.