मुंबई : भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याला विधान परिषदेवर आमदार करण्यात यावा अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनानं राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना पत्र पाठवून झहीर खान यांच्यासह १२ जणांची राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी विचार करण्यात यावा अशी विनंती केली आहे. विधान परिषदेवर १२ सदस्यांची राज्यपाल नियुक्ती करतात. साहित्य, कला, सहकार किंवा सामाजिक कार्य या क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा या उद्देशाने ही नियुक्ती केली जाते
महाराष्ट्रामध्ये राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या १२ जागा रिक्त झालेल्या आहेत. विज्ञान , साहित्य, कला, सहकार क्षेत्र व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देण्याची परंपरा आहे. राज्यामध्ये अनेक नामवंत आहेत की ज्यांना आजपर्यंत कोठेही संधी मिळालेली नाही.
त्यांचे अनेक वर्ष आपल्या आपल्या क्षेत्रात काम सुरु आहे. तरी आपण खालील नामवंताना आपल्या कोट्यातून आमदार करण्याबाबत विनंती करत आहोत. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही विनंती. झहीर खान याच्याशिवाय मकरंद अनासपुरे, अमर हबीब, निवृत्ती महाराज इंदोरीकर आणि प्रकाश आमटे यांच्याही नावांचा समावेश आहे.
सदाभाऊ खोत यांनी खालील १२ नावांची शिफारस केली आहे –
मकरंद अनासपुरे
विठ्ठल वाघ
विश्वास पाटील
झहीर खान
मंगलाताई बनसोडे
अमर हबीब
निवृत्ती महाराज इंदोरीकर
पोपरटार पवार
तात्याराव लहाने
प्रकाश आमटे
सत्यपाल महाराज
बुधाजीराव मुळीक
Read Also :
‘अडचणीत आणाल तर आम्ही आणखी बळकट होऊ’, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं भाजपला प्रत्युत्तर
लग्न एकासोबत लफडं दुसऱ्यासोबत मनसेची शिवसेनेवर खोचक टीका
‘वर्षभरापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, तरीही महाविकास आघाडी सरकार आलं आणि टिकलं’