मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्यांनी पहिल्या दिवशी शिवसेना खासदार संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत संयुक्त पत्रकार परिषदसुद्धा घेतली. आता ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मुंबई भाजपच्या नेत्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भारताच्या राष्ट्रगिताचा अवमान केल्या प्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला धक्का; ‘या’ बड्या नेत्यासह अनेक जण बांधणार ‘घड्याळ’
भाजप नेत्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगिताचा अवमान केला असून त्यांनी खुर्चीत बसूनच राष्ट्रगीत म्हटले. तसंच काही ओळींनतंर मधेच ते थांबवलं असंही या तक्रारीत म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या शिवेसेना नेत्यांच्या भेटीत काय चर्चा झाली हे जाहीर करावं अशी मागणीही भाजपच्यावतीने करण्यात आली होती. शिवसेना आता महाराष्ट्रातले उद्योग पश्चिम बंगालला घालवून इथल्या लोकांना वडापाव विकायला लावणार का? असा सवालसुद्धा भाजपने केला होता.
आज @Shivsena ला राष्ट्रगीताचा अपमान करणारे अधिक प्रिय आणि जवळचे वाटू लागले आहेत ? मुंबईत येऊन राष्ट्रगीताचा अपमान करण्यात येतो आणि शिवसेनेचे नेते राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांच्या समोर झुकतात ही घटना मुंबईकर कधीही विसरणार नाही. pic.twitter.com/MTxWZW9AjG
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) December 1, 2021
ममता बॅनर्जी यांचा व्हिडिओसुद्धा महाराष्ट्र भाजपने शेअर केला आहे. त्यात भाजपने ट्विटरवर म्हटलं आहे की, आज शिवसेनेला राष्ट्रगीताचा अपमान करणारे अधिक प्रिय आणि जवळचे वाटू लागले आहेत ? मुंबईत येऊन राष्ट्रगीताचा अपमान करण्यात येतो आणि शिवसेनेचे नेते राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांच्या समोर झुकतात ही घटना मुंबईकर कधीही विसरणार नाही.
Read Also :
- चिंता वाढली: ओमिक्रॉन आणखी २३ देशांमध्ये पसरला, व्हेरिएंटचा आणखी प्रसार होऊ शकतो
- जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सदस्यांची संख्या वाढणार..
- “आता UPA राहिलेली नाही, फक्त जाहीर करायचं बाकी”; ममताजींची काँग्रेसवर जोरदार टीका
- वीज काय फुकटात तयार होते का? वीज बिल भरावचं लागेलं; उर्जामंत्र्याची शेतकऱ्यांना तंबी
- ममता बॅनर्जींची सिल्हर ओक’वर हजेरी; भेटीनंतर शरद पवारांनी सांगितली २०२४ ची रणनिती