नवी दिल्ली – देशात एनडीएला पर्याय म्हणून संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचा जन्म झाला होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी युपीएचं नेतृत्व करताना आघाडीला देशात दोन वेळेत सत्ता मिळवून दिली. पण सध्या पुन्हा एनडीएचं सरकार सत्तेत असताना युपीए मात्र निष्प्रभ्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर “आता युपीए राहिलेली नाही, याबाबत आता फक्त घोषणा करणंच बाकी आहे,” असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तीन दिवसीय मुंबई दौऱ्यादरम्यान बुधवारी त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर संयुक्तरित्या पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं.
शिवसेनेला मिळणार नवा मित्रपक्ष? ममता बॅनर्जींसोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची महत्त्वाची बैठक
बॅनर्जी माध्यमांशी बोलत असताना पत्रकारांनी त्यांनी प्रश्न विचारला की, शरद पवार युपीएमधील सर्वात वरिष्ठ नेते आहेत त्यामुळं तुम्हाला असं वाटतं का की शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करायला हवं? या पत्रकारांच्या प्रश्नावर काहीशा संतापलेल्या स्वरात ममता म्हणाल्या, “अरे तुम्ही युपीएची काय भाषा करता, आता युपीए राहिलेली नाही. आता फक्त हे जाहीर करायचं बाकी राहिलंय”
दरम्यान, “आज ज्या प्रकारे देशात फॅसिझम सुरु आहे, त्याविरोधात सक्षम पर्याय निर्माण झाला पाहिजे पण हे कोणा एकट्याचं काम नाही. जो सक्षम आहे त्याला घेऊन हे करावं लागेल. भाजपविरोधात लढणारा सक्षम पर्याय असायला हवा. कोणी लढायला तयार नाही त्याला आम्ही काय करणार?” अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडलं.
संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचे सडेतोड उत्तर
“नेता रस्त्यावर राहिला तरच त्या पक्षाचा विजय होतो, पण राहुल गांधी कायम परदेशात असतात” अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींवर खोचक टीका केली होती. यावर पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं असता ते म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये ममतांचा जो विजय झाला तो त्यांच्या मेहनतीनं झाला आहे. त्यामुळं त्यांचा वैयक्तिक अनुभावावरुन त्यांनी हे विधान केलं, ज्याचं आम्ही स्वागत करतो”
Read Also :
- वीज काय फुकटात तयार होते का? वीज बिल भरावचं लागेलं; उर्जामंत्र्याची शेतकऱ्यांना तंबी
- ममता बॅनर्जींची सिल्हर ओक’वर हजेरी; भेटीनंतर शरद पवारांनी सांगितली २०२४ ची रणनिती
- राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला धक्का; ‘या’ बड्या नेत्यासह अनेक जण बांधणार ‘घड्याळ’
- शिवसेनेची ताकद वाढणार; वैभववाडीत अनेकांनी हाती बांधले शिवबंधन !
- ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल; तिसऱ्या आघाडीवर होणार चर्चा?