मुंबई – संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं आयोजित संगीत कार्यक्रमात संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत एका गाण्याच्या तालावर ठेका धरला. राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी डान्स केलेला व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. अनेकांनी या व्हिडीओचं कौतुक केलं. तर काहींनी त्यावर टीकेचा सुर लावला. या टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी खडे बोल सुनावले आहे.
…आणि पंकजा ताईंना पान तयार करण्याचा मोह आवरता आला नाही!
‘आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं. तौ कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यात बाहेरचे कोणीही नव्हते. आमच्या खासगी कार्यक्रमात आम्ही काय करतो, यावर टीका करायची असेल तर कुणाला काय बोलणार,’ असा प्रतिप्रश्न उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी टीकारांना चांगलेच सुनावले आहे.
‘हिवाळी अधिवेशनाबाबत राज्य सरकारची बोटचेपी भूमिका’; फडणवीसांची सरकारवर टीका
भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सुप्रिया सुळे व संजय राऊतांच्या डान्सवर टीकास्त्र सोडले होते. एकीकडे एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या करत असताना तुम्ही लग्नात नाचत आहात. वीज कनेक्शन कापले जात असताना गावे अंधारात आहेत. हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का? असा प्रश्न विचारत विखे पाटील यांनी डान्सवर टीका केली होती.
Read Also :
- “आ देखें ज़रा किसमें कितना है दम”; नवाब मलिक यांचे प्रवीण दरेकरांना आव्हान
- निलंबनाच्या कारवाईवरून खासदार प्रियांका चतुर्वेदींनी व्यक्त केला संताप
- संसदेतील बारा खासदारांच्या निलंबनावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या… ‘हा’ तर रडीचा डाव
- 12 खासदार निलंबन प्रकरणी संसदेत गदारोळ, लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग
- “उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला”; सोमय्यांची घणाघाती टीका