अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर-अकोट मार्गावर आराळा-बोराळा फाट्याजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाला त्याच वेळी, राज्यमंत्री बच्चू कडू हे याच मार्गाने अकोला येथे जात होते. मात्र, हा अपघात पाहताच त्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली.
राज्यमंत्री बच्चू कडू केवळ अपघातग्रस्तांच्या मदतीलाच धावले नाही, तर त्यांनी या अपघातातील जखमींना स्वतःच्या गाडीतून दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातही पोहोचवले आणि दाखल केले. यानंतर ते पुन्हा अकोल्याच्या दिशेने रवाना झाले. या प्रसंगामुळे बच्चू कडू यांची रुग्णसेवक म्हणून असलेली प्रतिमा पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
Also Read
आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांमुळे कोल्हापुरातील आरोग्य यंत्रणेवर ताण : सतेज पाटीलhttps://t.co/T42dINLjII@satejp @INCMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 5, 2020