भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाली होती २९ जून रोजी त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनतर लगेचच त्यांना बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते.
मात्र आता आमदार महेश लांडगे यांना आदित्य बिर्ला रुग्णालयातून परिवारासह डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे हि माहिती सर्वाना दिली आहे.
माझी व माझ्या परिवाराची प्रकृती स्टेबल असून आम्ही आदित्य बिर्ला रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या होम आयसोलेशन द्वारे डॉ.विनायक पाटील यांच्या अंडर संपूर्ण कुटुंब घरीच ट्रीटमेंट घेत आहोत. काळजी नसावी, 15-20 जुलै पर्यंत ट्रीटमेंट सुरु राहिल, अशी पोस्ट करत फेसबुक आणि ट्विटद्वारे लांडगे यांनी आपल्या डिस्चार्जची माहिती दिली आहे.
नमस्ते,
माझी व माझ्या परिवाराची प्रकृती स्टेबल असून आम्ही आदित्य बिर्ला रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या होम आयसोलेशन द्वारे डॉ.विनायक पाटील यांच्या अंडर संपूर्ण कुटुंब घरीच ट्रीटमेंट घेत आहोत. काळजी नसावी, 15-20 जुलै पर्यंत ट्रीटमेंट सुरु राहिल pic.twitter.com/1bz1i7y0eo— Mahesh Kisan Landge (@maheshklandge) July 5, 2020