शिवसेना आणि राष्ट्र्वादीध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असताना मनसेने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. “रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरुन सर्जिकल स्ट्राईकची फुशारकी मारणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादी काँग्रेसकडे भीक मागत आहेत. कालाय तसमें नमः” अशी टीका मनसे सरचिटणीस माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन केली आहे.
नगर जिल्ह्यातील पारनेरमधील पाच नगरसेवकांनी थेट अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील तणाव वाढला आहे. पारनेरमधील शिवसेना नगरसेवक फुटीवरुन मनसेने हल्लाबोल केला.
शिवसेनेने ऑक्टोबर 2017 मध्ये मुंबई महापालिकेतील मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक फोडले होते. त्यामुळे जे तुम्ही इथे पेरणार आहात, तेच उगवणार आहे. महाभारतात सुद्धा अभिमन्यूला छळकपटाने मारणाऱ्यांना महाभारतामध्येच त्याची फळं भोगावी लागली हे त्यांनी लक्षात ठेवावं. जे पेराल तेच उगवेल”, असं संदीप देशपांडे म्हणाले.
रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरून सर्जिकल स्ट्राईक ची फुशारकी मारणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादी कडे भीक मागत आहेत कालाय तस्मै नम:
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 7, 2020