शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अज्ञात नंबरवरून फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यासंबंधी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. आता यावर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अस्मिता महत्वाची की लाचारी ते @NitinNandgaonk3 यांनी ठरवावं
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 23, 2020
“अस्मिता महत्वाची की लाचारी ते नांदगावकर यांनी ठरवावं” असे ट्वीट देशपांडे यांनी केले आहे.
कोरोनाग्रस्त रिक्षाचालकाचा मृतदेह ताब्यात देण्याबाबत आणि कुटुंबाला दिलेले बिल कमी करण्यावरून हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षकांशी नांदगावकर यांचा वाद झाला होता. तेथील रुग्णालयाचे सीईओ सुदीप चटर्जी यांनी मला दम देऊन आठ लाख रुपये भरा आणि मृतदेह घेऊन जा, असे सांगितले होते. असे नांदगावकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
नितीन नांदगावकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता.परप्रांतीयांविरोधातील आंदोलनासाठी त्यांची ओळख आहे. “अस्मिता महत्वाची की लाचारी ते नितीन नांदगावकर यांनी ठरवावं” असे ट्वीट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले असून, हे ट्विट नांदगावकर यांना आलेल्या धमकीची पार्श्वभूमी असल्याचे मानले जात आहे.