IMPIMP
Modi 3.0 government's account allocation announced, Gadkari is again responsible for road transport department Modi 3.0 government's account allocation announced, Gadkari is again responsible for road transport department

मोदी ३.० सरकारचं खातेवाटप जाहीर, गडकरींकडे पुन्हा रस्ते परिवहन विभागाची जबाबदारी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रविवारी ७२ मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांनी गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर आज मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहेत. यातच देशात नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा रस्ते व परिवहन खाते ठेवण्यात आले आहेत.यामध्ये अमित शाह यांच्याकडे पुन्हा गृह तर राजनाथ सिंह यांच्याकडे पुन्हा सरंक्षण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यातच मागच्या वर्षी अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारी होती. ती पुन्हा त्यांच्याकडे देण्यात आलंय.

हेही वाचा..“सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेऊन केंद्रीय राज्यमंत्री करा”, अजित पवार गटाचा ठराव मंजूर 

२०१९ च्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्री पद देण्यात आलं होतं. ते पुन्हा त्यांच्याकडे देण्यात आलं आहे.  अजय टमटा, हर्ष मल्होत्रा यांच्याकडे केंद्रीय राज्य रस्ते विकास मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा…“आता कशी वाजवली घंटी”? ‘ते’ विधान शिंदेंना भोवलं..! कोल्हापुरात कॉंग्रेसने शिंदेंना डिवचलं 

दरम्यान, राज्यातून एकूण सहा खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव यांचा समावेश आहे. आता यांना कोणत्या विभागाची जबाबदारी देण्यात येईल. ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“लोकसभेसारखं विधानसभेच्या जागावाटपाचं गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालून नका,” भुजबळांनी आधीच सगळं केलं स्पष्ट 

हेही वाचा..“धनंजय मुंडे, आता सुट्टी नाही हं..! सर्दी, पडसं झालं असं आम्ही ऐकणार नाय”, तटकरेंनी चांगलंच सुनावलं 

हेही वाचा…“राज्यात शिंदे-ठाकरे विधानसभेला पुन्हा एकत्र येणार” ? शिंदेंच्या नेत्यांनी दिला मोठा दुजोरा 

हेही वाचा..शिंदे गटानंतर आता अजित पवार गटातही मंत्रीपदावरून खदखद, आण्णा बनसोडे थेट स्पष्टच बोलले 

हेही वाचा..“ताई, आपली मळमळ, आम्ही समजू शकतो”, मुरलीधर मोहोळांकडून सुप्रिया सुळेंना जशास तसं उत्तर