राष्ट्ररक्षासमं पुण्यं, राष्ट्ररक्षासमं व्रतम्, राष्ट्ररक्षासमं यज्ञो,दृष्टो नैव च नैव च।।
नभः स्पृशं दीप्तम्… स्वागतम्!
असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे. राष्ट्ररक्षणासारखं पुण्य नाही, राष्ट्ररक्षणासारखं व्रत नाही आणि राष्ट्ररक्षणासारखा यज्ञ नाही, असा या संस्कृत श्लोकाचा अर्थ आहे.
फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा करार २०१६ साली नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात झाला. काँग्रेसने या मुद्दावरुन २०१९ लोकसभा निवडणुकीच्याआधी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राफेलच्या खरेदी व्यवहारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले होते. पण सरकारला न्यायालयाकडून क्लीन चीट मिळाली. विरोधकांना भ्रष्टाचार झाल्याचे कुठेही सिद्ध करता आले नाही.