IMPIMP
Mohols cooperate to shake the NCP's supremacy, BJP leadership's big move in Maharashtra Mohols cooperate to shake the NCP's supremacy, BJP leadership's big move in Maharashtra

राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी मोहोळांकडे सहकार खाते, भाजप नेतृत्वाची महाराष्ट्रात मोठी खेळी

पुणे : लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच खासदार झालेले पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रीमंडळात सहकार आणि नागरी उड्डाण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. यातच आता राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या सहकार क्षेत्रावर भाजपचा वरचष्मा राखण्यासाठी भाजप नेतृत्वाने ही खेळी केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हेही वाचा..शिंदे गटानंतर आता अजित पवार गटातही मंत्रीपदावरून खदखद, आण्णा बनसोडे थेट स्पष्टच बोलले 

पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रावर राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गटाचे वचर्स्व आहे. त्याला धक्का देण्यासाठी सहकार क्षेत्रात भाजपची पाळेमुळे रोवण्याचा उद्देश आहे. राज्याच्या सहकार क्षेत्रात सुरूवातीपासून कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला होता. परंतु माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कॉंग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर अनेक सहकारी संस्था, बॅंका, साखर कारखाने आणि सोसायट्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे.

हेही वाचा..“ताई, आपली मळमळ, आम्ही समजू शकतो”, मुरलीधर मोहोळांकडून सुप्रिया सुळेंना जशास तसं उत्तर 

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रांवर बहुतांश साखर कारखान्यांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. त्यामुळे दिल्लीतील भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या सहकार क्षेत्रातील वर्चस्वाला आणखी एक धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ यांना सहाकर राज्यमंत्रीपदाची धुरा देण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रावर राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गटाचे वचर्स्व आहे. त्याला धक्का देण्यासाठी सहकार क्षेत्रात भाजपची पाळेमुळे रोवण्याचा उद्देश आहे. राज्याच्या सहकार क्षेत्रात सुरूवातीपासून कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला होता. परंतु माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कॉंग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर अनेक सहकारी संस्था, बॅंका, साखर कारखाने आणि सोसायट्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“बारामतीचा दादा आता बदलायला हवा, युगेंद्र पवारांना विधानसभेची उमेदवारी द्या,” शरद पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी 

हेही वाचा..पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा..! मंत्रीपदाची शपथ अन् पहिल्याच दिवसापासून कामाला सुरुवात 

हेही वाचा…“लोकसभेसारखं विधानसभेच्या जागावाटपाचं गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालून नका,” भुजबळांनी आधीच सगळं केलं स्पष्ट 

हेही वाचा..“धनंजय मुंडे, आता सुट्टी नाही हं..! सर्दी, पडसं झालं असं आम्ही ऐकणार नाय”, तटकरेंनी चांगलंच सुनावलं 

हेही वाचा…“राज्यात शिंदे-ठाकरे विधानसभेला पुन्हा एकत्र येणार” ? शिंदेंच्या नेत्यांनी दिला मोठा दुजोरा