IMPIMP

मध्य प्रदेश सरकारही करणार ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध कायदा

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आगामी विधानसभा सत्रात शिवराजसिंह सरकारकडून लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर धर्म स्वातंत्र्य कायद्यासाठी विधेयक सादर केले जाणार आल्याची माहिती दिली आहे.  कायदा तयार झाल्यानंतर अजामीनपात्र कलमांतर्गत खटला दाखल करून दोषींना पाच वर्षांपर्यंत कडक शिक्षा दिली जाईल असे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हंटले आहे.
लव्ह जिहादसाठी मदत करणाऱ्यांना देखील मुख्य आरोपीप्रमाणेच शिक्षा दिली जाईल आणि विवाहासाठी धर्मांतरण करायला लावणाऱ्यांना देखील शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात असेल असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छेने धर्म परिवर्तन करून विवाह करायचा असल्यास संबंधित व्यक्तीला एक महिना अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे. तसेच, जबरदस्ती करून व धमकावून केलेला विवाह, ओळख लपवून केलेला विवाह या कायद्यानंतर रद्द मानला जाणार असल्याचेही ते म्हणाले.