नवीदिल्ली : “बॉलिवूडला टार्गेट केले आहे, पण या बॉलिवूड-टॉलिवूडने आमच्यासारख्या अनेक कलाकारांना नाव, प्रसिद्धी दिली आहे. आपण कोणत्याच इंडस्ट्रीला पूर्णपणे दोष देऊ शकत नाही. त्याचा एक छोटासा भाग आहे, जे ड्रग्जचे सेवन करतात. तुम्ही त्यांना बोला, पण संपूर्ण बॉलिवूडला बदनाम करु नका, देशातच नाही, तर जागतिक पातळीवर बॉलिवूडची प्रतिमा मलीन होत आहे” असे खासदार नवनीत कौर राणा म्हणाल्या.
“काही टक्के राजकीय नेत्यांची मुलेसुद्धा ड्रग्ज प्रकरणात आहेत. क्रिकेटचे तर ड्रग्जशी जुने कनेक्शन आहे. अमुक एका क्रिकेटपटूने ड्रग्ज घेतल्याचे आपण अनेकदा ऐकतो. बॉलिवूड ही अशी इंडस्ट्री आहे, जिला फक्त महाराष्ट्रातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आदराने पाहिले जाते. त्यामुळे तुम्ही अशी सरळ टीका करु शकत नाही. मी याबाबत कोणाचंही समर्थन करु शकत नाही” असेही नवनीत राणा म्हणाल्या.
फक्त बॉलिवूडच नाही, तर राजकारण आणि क्रिकेटमध्येही ड्रग्ज घेणाऱ्या व्यक्ती आहेत, असा आरोप राणा यांनी यावेळी केला आहे. संसदेच्या अधिवेशनानिमित्त नवनीत राणा सध्या राजधानी दिल्लीत आहेत.“महाराष्ट्र सरकार कोरोनावर फेल झाली आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी यावेळी केली.
Read Also
‘हा’ निर्णय शेतकऱ्यांना अडचणीत टाकणारा, अमोल कोल्हेंचे PM मोदींना पत्रhttps://t.co/Q8UJnuGoOV@kolhe_amol @supriya_sule @PawarSpeaks @narendramodi @NCPspeaks #MPAmolKolhe #PMModi #OnionExport #NCP #MarathiNews #PoliticalMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 16, 2020