हिंगोली : मागील काही दिवासापूर्वी हिगोलीचे खासदार राजीव सातव यांची कोराना टेस्ट पाँझिटीव आल्याने त्यांच्यावर पुण्यामधल्या जहांगीर रुग्णालयामध्ये उपचार चालू होते. खासदार राजीव सातव यांच्या तबेतील सुधारणा झाल्याने त्यांना डाँक्टराकडून डिर्चाज सुद्धा मिळाला होता. मात्र त्यांना झालेल्या न्युमोनियाचा संसर्ग कायम राहीला. त्यामुळे राजीव सातव यांची प्रकृती सुधारते आहे असे वाटत असतानाच ती पुन्हा खालावलीय.
पुण्यातील जहांगीर हॉ रुग्णलयामध्ये भरती असलेले कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती गंभीर बनली असून कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात दुपारी जहांगीर रुग्णालयामध्ये येणार आहेत. काही दिवसांपूर्वी राजीव सातव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याच डॉक्टरांनी सांगीतले होते. मात्र त्यांना झालेल्या न्युमोनियाचा संसर्ग कायम राहीला. त्यामुळे राजीव सातव यांची प्रकृती सुधारते आहे असे वाटत असतानाच ती पुन्हा खालावलीय. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी राजीव सातव यांच्या तब्येतवर लक्ष ठेवून आहेत आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेतेही जहांगीर हॉस्पिटलमध्ये येऊन सातव यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतायत.
२३ एप्रिलपासून राजीव रातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी स्वत:पुण्यातील डाँक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ञ्न डाँक्टरांकडून उपचार मिळावेत यासाठी राहूल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते….