मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि मुंबई महानगरपालिकेतील वाद काही दिवसांपुर्वी चर्चेत होता. मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करत कंगनाच्या कार्यालयावर हातोडा चालवण्यात आला होता. मात्र या प्रकरणात न्यायालयाने महापालिकेला फटकारले होते. परंतु, आता कंगनाच्या घरावर महापालिकेचा हातोडा चालण्याची शक्यता आहे.
कंगनाच्या बांद्रा येथील घरात अवैध बांधकाम करण्यात आल्याच्या पालिकेच्या नोटिशीवर कोर्टाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामळे आता दीड महिन्यांनंतर कंगनाच्या घरावर मुंबई महानगरपालिका हातोडा चालवू शकते.
खार येथील ऑर्किड प्लाझा या आलिशान इमारतीत पाचव्या मजल्यावर कंगनाचे तीन फ्लॅट असून हे फ्लॅट तिने एकत्र केले आहेत. मात्र हे करताना इमारतीच्या प्लानमधील मुख्य स्ट्रक्चरमध्ये बदल केल्याने महापालिकेने कंगनाला 26 मार्च 2018 रोजी नोटीस बजावली होती.
या कामाला न्यायालयाने अनधिकृत ठरवले असून, याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी कंगनाला सहा आठवड्यांची मुदत दिली आहे.