मुंबई : कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयातील बेकायदा बांधकामावर पालिकेने एक दिवसाची नोटीस देऊन कारवाई केली होती. ती सुरू असतानाच कंगनाने न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबतचा खटला सध्या उच्च न्यायालयात सुरू आहे. खटल्यात बाजू मांडण्यासाठी महापालिकेने ज्येष्ठ विधिज्ञ अस्पी चिनॉय यांची नियुक्ती केली आहे.मात्र कंगना सोबत पालिकेची चाललेली
अभिनेत्री कंगना राणावत हिने महापालिकेविरोधात दाखल केलेल्या खटल्यातील वकिलाच्या शुल्कापोटी पालिका प्रशासनाने आतापर्यंत 82 लाख 50 हजार रुपये खर्च केले आहेत. माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळवण्यात आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती मिळवली आहे.ज्यानुसार स्पष्ट झाले आहे की या न्यायालयीन लढाईसाठी पालिकेने आतापर्यंत 82 लाख 50 हजार रुपये खर्च केले आहेत.
पालिकेने 8 सप्टेंबर रोजी कार्यालयातील बेकायद बांधकामाबाबत कंगनाला नोटीस बजावली होती. 24 तासांत सर्व संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश नोटिशीमध्ये देण्यात आले होते; मात्र कंगनाकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने दुसऱ्या दिवशी पालिकेने कारवाई सुरू केली. कारवाई सुरू असताना कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Read Also
'मराठा समाजाला न्याय देऊन नोकरभरती प्रक्रिया राबवण्याच्या हालचाली,मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती https://t.co/HCSH8ktxNr#Vijaywadettiwar #CMUddavthackarey #MarathaReservation @VijayWadettiwar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 28, 2020