मुंबई : मुंबई पोलिसांचा पगार आता HDFC बँकेतून मुंबई पोलिसांचा पगार आतापर्यंत अॅक्सिस बँकेतून होत असे, मात्र आता हा निर्णय आता बदलण्यात आला असून, येथून पुढे पोलिसांचा पगार आता एचडीएफसी बँकेत होणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची वेतन खाती एचडीएफसी बँकेत वळवण्यात आली आहे. मुंबई पोलीस आणि इतर मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे पगार या बँकेतून केले जातील.
मुंबई पोलीस दलात सुमारे चार हजार अधिकारी तर 42 हजार अंमलदार आहेत. 2003 मध्ये मुंबई पोलीस दलासह मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची वेतन खाती अॅक्सिस बँकेत सुरू करण्यात आली. 2015 मध्ये बॅँके सोबत सामंजस्य करार करण्यात आला. त्यान्वये वेतन खात्यांची मुदत 2020 पर्यंत वाढवण्यात आली होती.
एचडीएफसी बँकेसोबत सामंजस्य करार करण्यात आल्यानंतर ता मुंबई पोलिसांना अनेक सुविधा मिळणार आहेत. यात नैसर्गिक किंवा करोनामुळं मृत्यू झाल्यास १० लाखांचे विमा संरक्षण देखील देण्यात आले आहे. उपचार व विमा कवच देखील देण्यात आले आहे.