पुणे : संजय राऊत हा ठाकरे गटाच्या नेत्यांना जेलमध्ये पाठवण्याची तयारी करत आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कसे जेलमध्ये जातील याची तयारी संजय राऊत करत आहेत. ठाकरे कुटुंबाला जेलमध्ये टाकायचा आहे, म्हणून संजय राऊत यांचे केंद्र बारामती झाला आहे. असा मोठा दावा शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. यातच शिवसेनाप्रमुखांनंतर प्रभावी नेता उद्धव ठाकरे नसून शरद पवार आहेत हे राऊत यांनी दाखवून दिले आहे. अशी टिका देखील त्यांनी केलीय.
हेही वाचा…“श्रीरंग बारणेंना कुठून सर्वात जास्त लीड मिळणार ? ” देवेंद्र फडणवीसांनी थेट आकडाच सांगितला
संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील मोठा घणाघात चढवला आहे. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आदित्य ठाकरेला संजय राऊत स्क्रिप्ट लिहून देत आहेत. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त काळ पक्षात घालवला आहे आणि पक्षासाठी काम केले आहे, तसेच असुदुद्दीन ओवेसी यांनी सभा घेतली. विषारी मते पेरण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महाविकास आघाडीबरोबर गेलेल्यांना ओवेसी यांनी चपराक लगावली असल्याचेही शिरसाठ म्हणाले.
हेही वाचा..“महायुतीत काम करण्याची मोठी संधी”, बारणेंची आघाडीवर टिका तर महायुतीचं कौतूक
बारामती आता केंद्र झाल्याचे ठाकरे गटाचे प्रवक्ते म्हणत आहेत. मातोश्री केंद्र राहिले नाही. आता बारामती झाले आहे. बाळासाहेबांनंतर शरद पवार आहेत.मला असे वाटते की, संजय राऊत हा ठाकरे गटाच्या नेत्यांना जेलमध्ये पाठवण्याची तयारी करत आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कसे जेलमध्ये जातील याची तयारी संजय राऊत करत आहेत. ठाकरे कुटुंबाला जेलमध्ये टाकायचा आहे, म्हणून राऊत यांचे केंद्र बारामती झाले आहे. शिवसेनाप्रमुखांनंतर प्रभावी नेता उद्धव ठाकरे नसून शरद पवार आहेत हे राऊत यांनी दाखवून दिले आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
सुप्रिया सुळे पराभूत होणार आहेत. नातेसंबंध तुटत नसतात. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे नात तुटणार नाही, हे पवार कुटुंब आहे, असे शिरसाट म्हणाले. तर, रोहित पवार यांनी पराभव मान्य केला आहे. त्यामुळे व्हिडिओ ट्वीट करणे, कोणालातरी धमकवणे आणि शरद पवारांचा वारसदार आहे, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे, हे लोकांच्या लक्षात आले आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली.
READ ALSO :
हेही वाचा…“साहेबांनी आता आराम करावा, असं नेत्यांनी सांगायला हवं,” अजितदादांची प्रतिक्रिया
हेही वाचा…‘मुरलीअण्णा प्रभू श्रीरामांचे भक्त, २७ हिंदुत्ववादी संघटनाचा मोहोळांना पाठिंबा
हेही वाचा..पुण्याचा खासदार कोण होणार ? पुणेकरांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?
हेही वाचा…“तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे असतील तर..,’आढळरावांचं मतदारांना आवाहन
हेही वाचा…“श्रीरंग बारणेंना कुठून सर्वात जास्त लीड मिळणार ? ” देवेंद्र फडणवीसांनी थेट आकडाच सांगितला