पिंपरी चिंचवड : यंदाचा माझा वाढदिवस कुणीही साजरा न करता कोरोनायोद्धा आणि गरजूंना मदत करावी, आपण एका मोठ्या संकटाला सामोरं जात आहोत त्यामुळे यावर्षीचा माझा वाढदिवस कोरोना योद्धयांना समर्पित करण्याचे ठरवले आहे.
तेव्हा वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग लावू नयेत तसेच कार्यक्रम, अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करु नये. सोशल मीडियाद्वारे मला आपले शुभेच्छारुपी आशिर्वाद द्यावेत, असं आवाहन पिंपरी चिंचवड शहर भाजपा अध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी केलं आहे.
यासंदर्भात त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी माझे परिचित, सहकारी सर्वच 27 नोव्हेंबर रोजी माझा वाढदिवस साजरा करण्यास उत्सूक असतात. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे परिस्थिती बिकट बनली आहे.
निकटवर्ती कोरोनाने हिरावून नेण्याचे माझ्यासारखे वेदनादायक अनुभव तुमचेही असतील पण तरीही आपण एकमेकांना धीर देत या संकटाचा सामना करत आहोत. अशा परिस्थितीत यावर्षी माझा वाढदिवस साजरा करणे योग्य नाही.
परंतु आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत, नियमांचे पालन करत आपल्या परिसरातील गरजू नागरिकांना मदत केल्यास मला माझा वाढदिवस साजरा झाल्याचे निश्चितच समाधान मिळेल.असं म्हटलं आहे. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात लोक संकटात आहेत, कित्येकांचे रोजगार गेले आहे. कोरोनाची स्थिती फारशी सुधारलेली नाही त्यामुळे आमदार महेश लांडगे यांनी लोकांना वाढदिवसाला गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे.
Read Also :
‘फडणवीसांना उठबशा काढू द्या, त्यांना आम्हीच चितपट करणार’ मंत्री जयंत पाटलांची वल्गना
फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश
कोरोनामुळे दिल्ली-मुंबई विमानसेवा बंद होणार?
भगव्याचा रंग तुम्हीच फिका केला ; आशिष शेलारांचा सेनेवर हल्लबोल