नागपूर मध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे हे आपआपल्या परीने हि संख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सावधगिरी बाळगत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सात दिवस विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे.
महापौर संदीप जोशी यांनी ट्विटरद्वारे पोस्ट करत हि माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हटले आहे. तसेच ज्या व्यक्ती आपल्या संपर्कात बुधवार संध्याकाळपासून होत्या, त्यांनीही स्वविलगीकरणाचा निर्णय घ्यावा असे आवाहन केले आहे.
Though I have not met with anyone still I request those who have come in contact with me after 6 pm yesterday to be observant and exercise self isolation.
— Sandip Joshi (@SandipJoshiNGP) August 6, 2020