नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. नांदेड जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते.
त्यानंतर त्यांचे वडील आणि भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. पिता-पुत्रावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु आहेत.
मार्च महिन्यापासूनच चिखलीकर पिता-पुत्र दोघेही सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यातून त्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. चिखलीकर यांच्या संपर्कात आलेल्या अन्य सात जणांची चाचणीही पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.