मुंबई: भाजपचे खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपनं शिवसेनेविरोधात दंड थोपटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशावेळी आता भाजपकडून मुंबई महापालिका निवडणूक कोअर कमिटीवर आमदार नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुकल्याचंच पाहायला मिळत आहे. कारण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई प्रदेशने मुंबई महानगरपालिका निवडणूक कोअर कमिटी गठीत केली आहे. त्यात आमदार नितेश राणे यांना स्थान देण्यात आलंय.
हे पण वाचा: लोकल सुरु करा अन्यथा जनतेसाठी रेल ट्रँक वर उतरु; प्रविण दरेकर यांचा इशारा
भाजपच्या मुंबई महानगरपालिका निवडणूक कोअर कमिटीवर अनेक जेष्ठ नेत्यांचा समावेश आहे. त्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, आमदार अतुल भातखळकर, आमदार सुनील राणे, आमदार अमित साटम, आमदार प्रसाद लाड, मनोज कोटक, प्रवक्ते संजय उपाध्याय आदी नेते या कमिटीत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी कोअर कमिटीतील या नेत्यांचा अनुभव भाजपसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
हे पण वाचा: आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून २३ गावांचा घाट घातला; महापौर मुरली मोहोळांचा घणाघात
दरम्यान, नारायण राणे केंद्रात मंत्री बनल्यानंतर आमदार नितेश राणे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. काल पार पडलेल्या बैठकीत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाच्या ६ जागांसाठी भाजप वेगळी रणनिती आखणार असल्याची माहिती मिळतेय. भाजपसाठी या ६ जागा प्रतिष्ठेच्या असणार आहे. या ६ जागांवरही भाजप दमदार उमेदवार देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.