मुंबई : ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असं घोषवाक्य घेत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या रेल्वे मंत्रालयात कंत्राट मिळवण्यासाठी चार लाख डॉलरची लाच ओरायकल कंपनीने दिल्याप्रकरणी २३ मिलियन डॉलरचा दंड युनायटेड स्टेट्स सिक्युरिटी ॲंड एक्स्चेंज कमिशनने कंपनीला ठोठावला असून याप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.
“सगळे वाईट, तुम्ही एकटेच चांगले का ?” मनसेचा ठाकरेंना खोचक सवाल
नरेंद्र मोदी यांनी देशात सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांच्याच राजवटीत ओरायकल कंपनीच्या माध्यमातून भारतीय रेल्वे अंतर्गत कंत्राट मिळण्यासाठी जवळपास चार लाख डॉलरची लाच देण्यात आली याचा खुलासा झाला असून जेव्हा हा भ्रष्टाचार झाला त्यावेळी रेल्वे मंत्रालय पियुष गोयल यांच्याकडे होते. मात्र एवढ्या मोठ्या भ्रष्टाचारावर रेल्वे मंत्रालयाने किंवा भारत सरकारने अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे या चार लाख डॉलरचा भ्रष्टाचार करुन ज्यांनी कंत्राट दिले त्यांची चौकशी करुन जनतेसमोर उभे केले पाहिजे अशी मागणीही महेश तपासे यांनी यावेळी केली. तसेच याबाबत तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी केली.
सुषमा अंधारेंनी शिवतीर्थ गाजवलं..! नारायण राणे, फडणवीसांना धो धो धुतलं
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर झाला. वास्तविक राज्यातील जनतेची खूप अपेक्षा होती की, राज्याचे मुख्यमंत्री राज्याला संबोधन करत असतात तेव्हा राज्याच्या हिताच्या योजना किंवा धोरण मांडतील. परंतु योजना मिळणे तर दूरच राहिले. मुख्यमंत्र्यांना भाषणात धोरणही जाहीर करता आली नाहीत त्यामुळेच त्यांचा हा मेळावा फेल झाला आहे अशी टीका महेश तपासे यांनी माध्यमांशी बोलताना केली. या मेळाव्याला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला बोलावले असते तर महाराष्ट्राला आधार मिळाला असता परंतु चंपा थापाला बोलावून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांचा एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपमान केला आहे, असा आरोपही महेश तपासे यांनी यावेळी केला.
“आज एकनाथ शिंदेंनी श्रीकृष्णाची भूमिका बजावलीय, पण त्यांच्या मुलाने काय केले?”; शरद पोंक्षे
एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसवर टीका केली. त्यांनी जरुर टीका करावी. परंतु अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना हेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शेजारी बसलेले जनतेने पाहिले आहे आणि त्याकाळात मुंबई व महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेल्या सर्व निर्णयामध्ये शिंदे सहभागी होते. त्यामुळे आज टीकेतून दुजाभाव करण्यात आला ही गोष्ट बोलणे योग्य नाही असेही महेश तपासे म्हणाले. राजकारणात असताना आणि मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यातील जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा एकनाथ शिंदे यांच्याकडून होत्या मात्र या सर्व अपेक्षा फोल ठरल्या आहेत. कुठलीही नवीन योजना मोठा मेळावा घेऊनही मांडू शकले नाहीत. वैचारिक दिवाळखोरपणा या सरकारचा आहे का अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे, असा हल्लाबोल महेश तपासे यांनी यावेळी केला.
अंधेरी पोटनिवडणूकीत शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा. दणदणीत विजय मिळविला जाईल… अंधेरी पोटनिवडणूकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर पाठिंबा असून प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवारसाहेब यांनी तशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची ही जागा प्रचंड मताने निवडून येईल असा विश्वास महेश तपासे यांनी यावेळी व्यक्त केला. स्वतःला शिवसेना म्हणवून घेणार्यांना या निवडणुकीत भाजपने साधं विचारलंही नाही आणि भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेना म्हणून शिंदे गटाला जवळ केले असेल तर ती जागा सोडायला हवी होती. मात्र तसे न करता भाजपने शिंदे गटाला डावळून भाजपची उमेदवारी जाहीर केली आहे. यातून भाजपची काय रणनीती आहे हे सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे शिवसेनेची ही जागा दणदणीत मतांनी निवडून आणू असा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.
Read also
- दहा डोक्याचा नाही तर 50 खोक्यांचा खोकासुराचं शिवाजी पार्कवर दहन
- “तुम्हाला कसं काय जमतं बुवा ?” शितल म्हात्रेंचा सुषमा अंधारेंना खोचक टोला
- “….त्यात निरागसतेला ओढू नका हो..!”; शिवतीर्थावरील टिकेनंतर श्रीकांत शिंदेंच उद्धव ठाकरेंना पत्र
- एसटीच्या बुकिंगकरिता 10 कोटीची कॅश कशी घेतली.? कोणी दिली? याची इडी चौकशी करणार का?
- “शिंदेंचं भाषण म्हणजे भाजपने लिहून दिलेली रटाळ बोअर क्रिप्ट”