मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना करोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे उपचारांसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये असंही आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं आहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मी दाखल होणार आहे असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.
माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची Covid चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल.@NCPspeaks
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 19, 2020
दरम्यान दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली असून त्याविषयी केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारने यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात या बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड खबरदारी घेतली जात असून महाराष्ट्र सरकार युद्धपातळीवर काम करत आहे.
Read Also ;
मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा भाजपाचा प्रयत्न; संजय राऊतांचा आरोप
…मग तुम्ही सत्तेत कशासाठी बसला आहात?, चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला सवाल