पुण्यातील जुन्नर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपास 300 वर पोहचला आहे. अनेक लोकप्रतिनिधींना देखील कोरोनांची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, जुन्नर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दिनेश दुबे यांचे कोरोनामुळे निधन झाले.
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर पुण्यातील रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची निधन झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणूनही कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी दिनेश दुबे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना काल पहाटे दुबे यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहर आणि परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.