मुंबई : इक्बाल मिर्ची यांच्यासोबत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांची इडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याकडून इडीने काही संपत्ती देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच इक्बाल मिर्ची यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना देखील इडीने ताब्यात घेतलं असून त्यांची देखील चौकशी सुरू आहे. मुंबईतील सीजे हाऊस ही बिल्डिंग , अॅस्ट्रिया मॉलच्या समोरच्या परिसरात इडीने चौकशी सुरू केली आहे.
द्रौपदी मुर्मू यांना विरोधी पक्षातील 99 खासदारांनी केलं मतदान; य़शवंत सिन्हा पिछाडीवर
प्रफुल पटेल यांच्यावर मागील काही दिवसात देखील इडीने टाच आणली होती. मुंबईतील त्यांच्या सीजे हाऊसमधील काही संपत्तीवर इडीने संशय व्यक्त केला होता. त्यामुळे आज पुन्हा एकदा सकाळपासून प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील चार जागांवर चौकशी सुरू आहे. तसेच आज प्रफुल पटेल आज मुंबईतच होते. त्यामुळे यानंतर आता पटेल यांच्यावर कोणत्या प्रकराची कारवाई करण्यात येईल ते आता पाहणं महत्वाचं ठऱणार आहे.
“सगळं संपल्यानंतरही शिवसेना नेत्याचा शिंदे ठाकरेंना एकत्र करण्यासाठी प्रयत्न”
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अनिल देशमुख, आणि नवाब मलिक यांच्यावर देखील इडीने कारवाई केली आहे. राष्ट्रवादीचे हे दोन्ही नेते सध्या आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी तुरूंगात आहेत. त्यामुळे आता प्रफुल पटेल यांच्यावर देखील इडीचा ससेमिरा पाठीमागे लागला आहे. पटेल यांची अलिकडेच राज्यसभेच्या निवडणुकीत खासदार म्हणून निवड कऱण्यात आली होती. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Read also
- “तर लोकं तुम्हाला काय बोलतात ते ही ऐका “? केसरकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
- आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते मग सगळा अभ्यास त्यांनीच केला का?
- “उद्धव ठाकरे आजारी पडलेत तेव्हाच शिंदेंनी मुख्यमंत्री होण्याची चाचपाणी सुरू केली”
- यंदा गणपती बाप्पा लवकरच पावला; यंदा सर्व सण निर्बंधमुक्त होणार; मुख्यमंत्री
- “येणाऱ्या पंधरा दिवसात अख्खी शिवसेना आमच्यासोबत”; आढळराव पाटलांचा दावा