मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळेला अटक केली आहे. मात्र पोलीस ठाण्यातील बाहेर पडताच राष्ट्रवादी युवक महिला कार्यकर्त्यांनी केतकी चितळेवर शाईफेक आणि अंडी फेकल्या आहेत. त्यावेळी तिच्या विरोधात जोरदार घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
केतकी चितळेंनी केलेली पोस्ट अत्यंत खालच्या दर्जाची असून तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली होती. . समाजात तेढ निर्माण करण्याचे कृत तसेच दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होईल अशा पद्धतीची पोस्ट केल्याने तिच्यावर कलम 505(2), 500, 501,153 ए नुसार कळवा पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी देखील केतकी चितळ्याचा समाचार घेतला आहे. चि चि चवताळीस बाई तू महिला असली तरी छपरीच तु, संस्कार नसलेली केतकी, इतकीशी कशी चवताळीस हरामखोर विकृती, मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहीजे. कशात ना मशात केतकीबाई तमाशात , लवकरच जंगी चोपाची गरज आहे हिला ,मिळणारच बाई तुला चोप. असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.