माजी खासदार निलेश राणे यांनी एका तरुणाचा पोलिसांशी बाचाबाची करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहा हा तरूण शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांचा मुलगा असल्याचा दावा निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. याशिवाय खासदाराचा मुलगा असल्याने संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला नाही, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊतच्या मुलाने एका पोलिसाला शिवीगाळ केली. भर पावसात एक पोलिसवाला ड्यूटी करतोय आणि खासदाराचा मुलगा दारू पिऊन शुद्धीत नसल्यासारखा त्याला धमकी देतोय. दारू पिऊन गाडी वेडी वाकडी चालवली तर पोलिस पकडणारचं. ही Section 353 आणि 185 अंतर्गत केस बनते. pic.twitter.com/ELqkjFFB30
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 17, 2020
निलेश राणे यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या मुलाने एका पोलिसाला शिवीगाळ केली. भर पावसात एक पोलिसवाला ड्यूटी करतोय आणि खासदाराचा मुलगा दारू पिऊन शुद्धीत नसल्यासारखा त्याला धमकी देतोय. दारू पिऊन गाडी वेडी वाकडी चालवली तर पोलिस पकडणारचं. ही कलम 353 आणि 185 अंतर्गत केस बनते.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना निलेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्गातील कणकवली बाजारपेठेत संध्याकाळी 5 ते 6 च्या दरम्यान ही घटना घटली. पोलिसांशी हुज्जत घालणारी व्यक्ती ही 100 टक्के विनायक राऊत यांचा मुलगाच आहे. तो मुलगाही व्हिडीओमध्ये विनायक राऊत यांना मुलगा असल्याचं सांगत आहे. खासदाराचा मुलगा असल्यामुळे अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही. ज्या भाषेत तो तरूण त्या पोलिसांना धमकी देत आहे त्यानुसार कलम ३५३ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. दाऊ पिऊन जर कोणी असे प्रकार करत असेल तर त्याला तुरूंगात टाकलंच पाहिजे.