मुंबई : कंगना राणावत प्रकरणावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे वारंवार भाजपवर थेटपणे आरोप करत आहेत. त्यांच्याच या आरोपांना आता नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी उत्तर दिले आहे. यावेळी निलेश राणे यांनी सचिन सावंत यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे.
गद्दार भाजप महाराष्ट्रातून साफ होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असे म्हणत सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्याला रिट्विट करत निलेश राणेंनी सचिन सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले राणे नेमकं यावेळी
कोण बोलतंय हे… हा लुक्का सावंत ज्याला आमदारकीला फक्त १२००० मतं मिळाली, deposit पण गेलं आणि महाराष्ट्रात काँग्रेस सगळी मिळून ४४ ला आटपली. सावंत विधान परिषदेसाठी धावपळ ठीक आहे पण तुझी लायकी गल्लीत बोलण्याइतकी नाही तू महाराष्ट्रच्या वार्ता करू नको. असे म्हणत निलेश राणे यांनी सचिन सावंत यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे.
कोण बोलतंय हे… हा लुक्का सावंत ज्याला आमदारकीला फक्त १२००० मतं मिळाली, deposit पण गेलं आणि महाराष्ट्रात काँग्रेस सगळी मिळून ४४ ला आटपली. सावंत विधान परिषदेसाठी धावपळ ठीक आहे पण तुझी लायकी गल्लीत बोलण्याइतकी नाही तू महाराष्ट्रच्या वार्ता करू नको. https://t.co/D2Ns50HpJV
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 10, 2020