रत्नागिरी : शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळे चर्चेत असलेल्या नाणार प्रकल्प आणि राजापूर एमआयडीसी प्रकल्पातील जमीन घोटाळ्याबाबत भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे उद्या रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत जमीन व्यवहाराबाबतचा भ्रष्टाचार नावासकट बाहेर काढणार असल्याची माहिती राणे यांनी ट्विटरवर ट्विट करत दिली आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नाणार प्रकल्प सध्या चर्चेत आहे. या प्रकल्पावरून शिवसेनेतच दोन मतप्रवाह असून स्थानिक शिवसैनिकांना प्रकल्पाला पाठिंबा आहे. तर खासदार विनायक राऊत यांच्यासह काही नेत्यांचा प्रकल्पाला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे बुधवारी २४ सप्टेंबरला रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन नाणार प्रकल्प व एमआयडीसी राजापूर या दोन्ही प्रकल्पांच्या जमीन घोटाळा प्रकरणी भांडाफोड करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात जमिन व्यवहारात मोठा भ्रष्टाचार कोण करतय हे नावासकट उद्या बाहेर काढणार असल्याची माहिती निलेश राणे यांनी ट्विटरवर दिली आहे.
काय म्हणालेत राणे नेमकं आपल्या ट्विटमध्ये
नाणार प्रकल्प व एमायडिसी राजापूर या दोन्ही प्रकल्पांच्या जमीन घोटाळा प्रकरणी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. जमिन व्यवहारात मोठा भ्रष्टाचार कोण करतय रत्नागिरी जिल्ह्यात हे नावासकट उद्या बाहेर काढणार.
नाणार प्रकल्प व एमायडिसी राजापूर या दोन्ही प्रकल्पांच्या जमीन घोटाळा प्रकरणी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. जमिन व्यवहारात मोठा भ्रष्टाचार कोण करतय रत्नागिरी जिल्ह्यात हे नावासकट उद्या बाहेर काढणार.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 22, 2020
Read Also
दसरा मेळाव्याचे यंदा काय होणार ? CM ठाकरे करू शकतात ‘या’ पर्यायाचा वापरhttps://t.co/oykVTQWMmi
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 22, 2020