चीनची मुजोरी कायम असून अनेक देश चीनविरोधात एकत्र आल्याचे दिसत आहे. चीनला उत्तर देण्याची वेळ आल्याचं विधान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी केले आहे. माईक पॉम्पिओंच्या या विधानातून चीनविरोधातल्या युद्धाचे संकेत मिळतात.
चहूबाजूंनी नाकाबंदी केल्यानंतरही चीनच्या डोक्यावरचं युद्धाचं भूत अजून उतरलेलं नाही. म्हणूनच जिनपिंग यांच्याविरोधात जागतिक पातळीवर दिग्गज नेत्यांनी एकीची वज्रमूठ बांधली आहे.
ब्रिटन , फ्रांस, इस्रायल , जर्मनी , ऑस्ट्रेलिया , जपान ,सौदी अरेबिया , इटली आणि कॅनडा या नऊ देशांनी चीनविरोधात बंड पुकारले आहे . या देशांपैकी पाच देशांनी समुद्रमार्गांवर चीनची घेराबंदी सुरु सुद्धा केली आहे. यात अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान, भारत या देशांचा समावेश आहे. भारतानं जमिनीवर विस्तारवादी ड्रॅगनला रोखून धरलं आहे. तर अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटननं समुद्रात चीनला घेराव टाकला आहे.तर चीनला अमेरिकेनं आतापर्यंत 4 वेळा इशारा दिला. विस्तारवादी धोरणाविरोधात हल्ल्याचीही धमकी देऊन पाहिली. मात्र चीनी ड्रॅगनची वृत्ती कुत्र्याच्या शेपटाप्रमाणेच राहिली. त्यामुळे इकडे अमेरिकेचाही संयम सुटत चालला आहे. म्हणून जिनपिंग यांच्यासोबत आता चर्चा किंवा भेटीगाठीची वेळ निघून गेल्याचं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.