IMPIMP
bjp bjp

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी काँग्रेसश्रेष्ठींनी साधं ट्विटही केलं नाही; नितेश राणे

 
मुंबई :  संपूर्ण दिवसभरात काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी संदेश किंवा साधे ट्विटही करण्यात आले नाही. काँग्रेस बाळासाहेब ठाकरे यांचीच दखल घेणार नसेल तर मग शिवसेनेकडे उरले तरी काय, असा परखड सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
 
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतीदिन सोहळा मंगळवारी संपन्न झाला. यानिमित्ताने राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली होती. तर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या शिवाजी पार्क येथे शिवसैनिकांनी गर्दी केली होती. पंकजा मुंडे, रामदास आठवले यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. तर इतर नेत्यांनी सोशल मीडियावरुन बाळासाहेबांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.  
 

मात्र, राज्यात शिवसेनेसोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या काँग्रेसच्या नेतृत्त्वाने बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कोणतेही ट्विट किंवा संदेश प्रसारित केला नव्हता. नितेश राणे यांनी नेमका हाच धागा पकडत आता शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसला वंदनीय असणाऱ्या व्यक्तींचा मान राखताना दिसत आहेत.