पुणे – नाशिक महामार्गावरील प्रवास सुखकर व्हावा. वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता व्हावी. या उद्देशाने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे- पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील प्रवाशांना सुखर प्रवास करता यावा म्हणून रस्त्याचे काम करण्यास तरतूद केली आहे. या रस्त्याच्या कामासाठी तब्बल ६५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मात्र, या कामाचे श्रेय घेण्यासाठी महाविकासआघाडीच्याच नेत्यांमध्ये चुरस लागली आहे. राष्ट्रवादी शिरुरचे खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यात चढाओढ सुरु आहे. अमोल कोल्हे यांच्या विनंतीबाबत केंद्रीय मंत्रालयाने ‘विद्यमान खासदार’ या नात्याने अमोल कोल्हे यांच्या पत्राला उत्तर दिले. त्याचा आधार घेत अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर नितीन गडकरी यांचे जाहीरपणे आभार मानले.
दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही २०१३ पासून पुणे –नाशिक महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी केलेल्या लेखी पाठपुराव्याचे दाखले सोशल मीडियावर दिले आहेत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनीही पुणे-नाशिक महामार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. भाजपाप्रणित केंद्र सरकारचे मंत्री म्हणून आमदार लांडगे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. तसेच, प्रकल्पाची वैशिष्ठे आणि पिंपरी-चिंचवडला होणारा फायदा याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली आ