मुंबई : ऑनलाईन शॉपिंग अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टकडून अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी तयारी दर्शवली होती. मात्र आता अॅमेझॉनकडून घुमजाव करण्यात आला आहे.
या मागणीच्या विरोधात ॲमेझॉन न्यायालयात गेले आहे. ॲमेझॉनच्या या पवित्र्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून त्यांनी ॲमेझॉनच्या विरोधामध्ये एक नवी मोहीम सुरू केलेली आहे.
‘नो मराठी… नो ॲमेझॉन, बॅन अमेझॉन, महाराष्ट्रात फक्त मराठी, इथून पुढे तुमची डिलिव्हरी तुमची जबाबदारी…’ असे म्हणत मनसेने ॲमेझॉन कंपनीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अॅमेझॉनच्या अॅपमध्ये मराठी भाषा नसेल तर महाराष्ट्रात मराठी माणसांनी अॅमेझॉनचं अॅप का वापरावे?, असा सवाल मनसेच्या स्टुडंट विंगच्या अखिल चित्रे यांनी केला आहे.
मनसेकडून आता अॅमेझॉनविरोधात ‘नो मराठी… नो ॲमेझॉन’ ही मोहिमच चालवली जात आहे.