Nokia C3 हा नोकियाचा स्मार्टफोन HMD Global या कंपनीने लाँच केला आहे. या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे स्वस्त आणि मस्त असा हा फोन आहे. किमतीच्या मानाने या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स आहेत. जवळपास साडेसात हजार रुपयांच्या आसपास या स्मार्टफोनची किंमत आहे. या स्मार्टफोनची विक्री १३ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. नोकियाच्या या फोनला खरेदी करण्यासाठी इच्छूक असणारे लोक चीनमध्ये फोनला प्री बुक करू शकतात.
असे आहेत फीचर्स :-
१) या हँडसेटमध्ये ५.९९ इंचाचा एचडी प्लस स्क्रीन आणि अँड्रॉयड १० यासारखे खास फीचर्स
२) नॉर्डिक ब्लू आणि गोल्ड सँड कलरमध्ये उपलब्ध
३) नोकियाच्या या फोनमध्ये रियरवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.
४) नोकिया सी ३ मध्ये ५.९९ इंचाचा (1440 × 720 पिक्सल) एचडी+ डिस्प्ले
५) फोनमध्ये 1.6 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर Unisoc SC9863A प्रोसेसर
६) ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला ४०० जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते.
७) एलईडी फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सलचा रियर, ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
८) 3040mAh बॅटरी