संजय राऊत यांनी एका मुलाखती दरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे. तसेच विविध राजकीय पक्षाकडूनही त्यांची खिल्ली उडवली जात आहे. आरोग्य संघटनांकडूनही त्यांचा निषेध करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उपरोधक शब्दांत राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
मी स्वतः कधी डॉक्टरांकडून औषधे घेत नाही. मी कंपाउंडरकडून औषधे घेतो या राऊत यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना चांगलेच टट्रोल व्हावे लागल्याचे दिसून आले. आमदार भातखळकर यांनी ट्विट करत खासदार राऊत यांच्या वक्तव्याबाबत भाष्य केले आहे. त्यात ते म्हणतात, “शिव वडापाव आणि शिव भोजन थाळीच्या घवघवीत यशानंतर आता येत आहेत, शिव दवाखाने…इथे डॉक्टरांच्या ऐवजी कंपाउंडर असतील.’
शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशा नंतर आता येत आहेत शिव दवाखाने…
इथे डॉक्टरांच्या ऐवजी
कंपाऊंडर असतील.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 17, 2020
काय म्हणाले होते संजय राऊत नेमकं
एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार राऊत म्हणाले होते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेडिकल, औषधे यांचा अभ्यास दांडगा आहे. आरोग्य व्यवस्था, यंत्रणा हे त्यांना चांगले माहिती आहे. कारण, मुंबईत सातत्याने विविध आजार येत असतात. जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतंय ? ते पण सीबीआय सारखेच आहेत. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे काय हो ? इकडून तिकडून गोळा केलेली माणसेच आहेत. त्यामध्ये डॉक्टर असले तरी मी स्वतः कधी डॉक्टरकडून औषधे घेत नाही. मी कंपाउंडरकडून औषधे घेतो, असे विधान राऊत यांनी केले होते.