IMPIMP
One ball.. two wickets" Awhad's tweet caused excitement One ball.. two wickets" Awhad's tweet caused excitement

“एक गुगली … २ विकेट पडणार क्या गेम ? एक बॉल.. दो विकेट” आव्हाडांच्या ट्विटने खळबळ

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. मागच्या निवडणुकीत महायुतीला तब्बल ४१ जागा मिळाल्या होत्या. तर या निवडणुकीत फक्त १७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. याचा परिणाम म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज दिल्लीत देखील दाखल झाले आहेत. यावरूनच आता शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा..“कॉंग्रेसचे खासदार ९९ वरून १०० होणार ?” महाराष्ट्रातील एकमेव अपक्ष खासदार कॉंग्रेसमध्ये जाणार 

राज्यात कॉंग्रेसला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या आहेत. त्याच्या खालोखाल भाजपला ९, ठाकरे गटाला ९, शरद पवार गटाला ८ तर अजित पवार गटाला एक जागा मिळाली आहे. यावरून आता राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यावरूनच एक गुगली … २ विकेट पडणार क्या गेम एक बॉल … दो विकेट असं ट्विट आव्हाडांनी केलंय.. त्यामुळे या ट्विटचा अर्थ आता सगळीकडे काढळा जात आहे.

हेही वाचा..“मी पुन्हा येईन असा गळा फोडून सांगणारे आता मला जाऊदे ना घरी म्हणताहेत” 

महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान वाटतो – या भूमीने कायमच मोठ्या आणि बदल घडवणा-या लढ्यांचे नेतृत्व केले आहे. इतिहास साक्षी आहे, महाराष्ट्र कधी कुणापुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही. शिवाजी-शाहू-फुले-आंबेडकरांच्या या भूमीने आज असंवैधानिक आणि लोकशाही विरोधी सरकारचं उच्चाटन करून पुन्हा एकदा आपलं वेगळेपण सिद्ध केलंय. संविधान आणि लोकशाहीला बळकट केलंय. असेही ते म्हणाले.

दरम्यान, आदरणीय शरद पवार साहेबांचं लढाऊ नेतृत्त्व, माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा झंझावाती प्रचार, काँग्रेसचं दमदार कमबॅक, महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांची मेहनत आणि लोकांनी दाखवलेला विश्वास या सगळ्याची मोट बांधून हा महाविजय आकाराला आला आहे. पण खरंतर हा फक्त ट्रेलर आहे, असली पिक्चर अभी बाकी है! हे असे कित्येक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी. असाही त्यांनी इशारा दिलाय.

READ ALSO :

हेही वाचा..NDA सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला ? शिंदेंच्या शिवसेनेलाही मिळणार कॅबिनेट पद 

हेही वाचा..केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असेल तर पंतप्रधानपदासाठी गडकरींपेक्षा चांगला पर्याय नाही 

हेही वाचा..पार्थ पवार, सुनेत्रा पवारांचा पराभव झाला, आता विधानसभेत अजित पवारांचाही पराभव होणार ? 

हेही वाचा..मोठी बातमी…! निकालाच्या दुसऱ्याच दिवशी खासदार लंकेंच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला 

हेही वाचा..“कॉंग्रेसचे खासदार ९९ वरून १०० होणार ?” महाराष्ट्रातील एकमेव अपक्ष खासदार कॉंग्रेसमध्ये जाणार