कोल्हापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आता पुण्यानंतर कोल्हापूरमध्येही लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांवर घरीच उपचार करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे.
त्यातच आता राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयातील विशेष अधिकाऱ्याला (OSD) कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयातील अनेक लोक संबंधित अधिकाऱ्याच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांच्याही तपासण्या करण्यात येत आहेत. या सर्वाचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. मात्र, त्याचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. हे अहवाल आल्यानंतरच त्यांच्या संपर्कातील किती जणांना कोरोना संसर्ग झालाय हे स्पष्ट होणार आहे.