IMPIMP
Padalkar, who was attacking the state government through the ST movement, why is he silent now Padalkar, who was attacking the state government through the ST movement, why is he silent now

एसटी आंदोलनातून राज्य सरकारवर गरळ ओकणारे पडळकर, खोत आता गप्प का?

मुंबई :  गेल्या महिन्यात एसटी विलिनीकरणाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी अनेक मोठ्या राजकीय घटना घडल्या. तसेच भाजपकडून गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोतांनी ही मागणी उचलून धरली होती. त्यामुळे आता राज्यात भाजपचे सरकार आल्याने एसटी महामंडळाचा प्रश्न मार्गी लागणार का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

“दिल्लीचा राग अजून गेला नाही”? फडणवीसांच्या वाढदिवशी नो, जाहिरात, नो होर्डिंग 

एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत देखील हजर होते. तर विधानभवनात देखील भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत एसटी कर्मचाऱ्यांची बाजू उचलून धरली होती. त्या आंदोलनावर एसटी कर्मचारी आणि राज्य सरकारशी अनेकदा बैठका झाल्यात मात्र त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.

“मंत्रिमंडळाच्या निर्णयावर राऊतांचं बोट;” संविधानाचा दाखल देत केला सवाल 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत राज्यात नवीन सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आता एसटी कर्माचाऱ्यांच्या आंदोलनातून गरळ ओकणाऱ्या भाजपचे नेते एसटी विलिनीकरणाचा मुद्दा मार्गी लावणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच याचा पाठपुरावा गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार का ? असा सवाल देखील नागरिकांकडून केला जात आहे.

“काय तो पाऊस, काय तो पुर, काय ते खड्डे, सगळं ओके आहे;”भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर टोलेबाजी 

दरम्यान, अलिकडेच गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर खोचक टोला लगावत टिका केली होती.  तेव्हा ते म्हणाले होते की, आमच्यावर खोट्या केसेस जयंत पाटलांनी घातल्यात तरी जनतेच्या प्रश्नावर आम्ही लढलो. आता सत्ता गेल्यावर यांचा चेहरा सुतक पडल्यासारखा झाला आहे. जयंत पाटील तुम्ही सत्तेच्या विरोधात काम करू शकत नाहीत. असं देखील गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता गोपीचंद पडळकर एसटी महामंडळाचा मुद्दा मार्गी लावणार का असाही प्रश्न आहे.

Read also