मुंबई : बंडखोर आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदेंनी मंत्रीमंडळाचा विस्तार आषाढी एकादशीच्या नंतर करणार असल्याचं सांगितलं होत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मंत्रीमंडळात स्थान द्यावे अशी मागणी आता मुंडे समर्थकांकडून केली जात आहे. मुंडेना स्थान मिळावे यासाठी समर्थकांनी वैद्यनाथाला साकडे देखील घातले आहे.
आषाढी एकादशीच्या नरेंद्र मोदींच्या वारकऱ्यांना खास शुभेच्छा; म्हणाले की..;”
भाजपच्या खासदार प्रीतम मुंडेंना भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले नव्हते. तेव्हापासून मुंडे समर्थकांत नाराजी असल्याचे बोलले जात आहे. विधानपरिषदेमध्ये देखील पंकजा मुंडेंना भाजपने डावलले होते. त्यामुळे आता शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये त्यांना स्थान देण्यात यावे, यासाठी मुंडे समर्थकांनी प्रभु वैद्यनाथाला साकडे घातले आहे.
“पुजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना क्लिनचीट”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुत्रं फिरवली
ओबीसी आरक्षणासाठी वारंवार सरकारकडे पाठपुरवठा करणाऱ्या मुंडेना संधी मिळणार का? असाही प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. शिंदे आणि फडणवीस सरकार मुंडे यांना मंत्रीमंडळात स्थान देऊन मुंडे समर्थकांची नाराजी दुर करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिंदे सरकार मंत्रीमंडळात कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार हे लवकरच ठरणार आहे.
“भाजपने मोठ्या मनाने उद्धव ठाकरेंशी संवाद साधवा”; दिपाली सय्यद
दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रते संदर्भात तातडीने सुनावणी न करता प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय सुनावला आहे. हा विद्यमान सरकारला दिलासा असून आता तरी शिवसेनेने रोज सर्वोच्च न्यायालयात नवनवीन याचिका करणे बंद करावे आणि आधीच केलेल्या याचिका मागे घ्याव्या, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ज्या दिवशी विधानसभेत बहुमत चाचणी झाली त्या दिवशी प्रत्यक्षपणे 164 आमदार मोजण्यात आले होते. यापेक्षा आणखी मोठा पुरावा कोणता हवा? असा प्रश्न देखील बावनकुळेंनी विचारला आहे.
Read also
- “यापेक्षा आणखी मोठा पुरावा कोणता हवा?” बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
- “बंडखोर आमदारांवर सध्या कोणतीही कारवाई नको,” सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला दिलासा
- “आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा निष्ठेचा मंत्र तुम्ही जपला”; ठाकरेंचा 16 आमदारांना भावनिक पत्र
- “आमच्या घरी आजही शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे”; बंडखोर आमदार सदा सरवणकरांचं वक्तव्य
- “ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूका होणार नाहीत”; निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण