विजयादशमीच्या मुहुर्तावर आज सावरगाव घाट येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन घेण्याचं योजण्यात आलं होतं, मात्र तरीही पंकजा मुंडेंच्या अनेक सर्मथकांनी यावेळी गर्दी केली.
यावेळी पंकजा मुंडे यांनी निवडणुकीत झालेल्या पराभवावरही भाष्य केलं. “जिंदगी की रेस में जो आपको दौडकर हरा नहीं सकते, वो आपको तोडकर हरानेकी कोशिश करते हैं”, मी कितीही धावायला तयार आहे पण तुटालया तयार नाही, असं त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर पूजा अर्चना केली आणि कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी शेतकरी आणि ऊसतोड कामगारांच्या व्यथा मांडल्या. तसेच, राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत ही अपूरी अजून मी त्यांच्याकडे आणखी मदतीची मागणी करणार आहे असंही त्या म्हणाल्या
तसेच मी घर बदलणार नाही आहे तिथं आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगड येथील दसरा मेळाव्यात बोलताना पक्षांतरांच्या चर्चांना पूर्णविराम दिला. आता राष्ट्रीय मंत्री झाली आहे. पक्षाच काम देशाच्या पातळीवर करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात स्पष्ट केले.