मुंबई : देशभरात महमरीच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव जाणवत असून, महामारीने बाधित रुग्णांची संख्या दररोज नवीन उच्चांक गाठत आहे. तसेच महामारीने होणारे मृत्यूही वाढताना पाहायला मिळत आहे. राज्यातदेखील परिस्थिती साधारण असली तरी, रुग्णसंख्या वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. दरम्यान, आमदारांच्या हॉस्टेल बांधकामासाठी ठाकरे सरकारने टेंडर काढल्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली होती. याला आता रोहित पवारांनी प्रतुत्तर दिले असून, पंतप्रधानांचे निवासस्थान आणि नवीन संसद भवनाचे काम पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करावा आणि केंद्राला लसीकरणाकडे लक्ष देण्यास सांगावे, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
सध्या राजकारण बाजूला ठेवून आपण लोकप्रतिनिधी म्हणून राज्यातील जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करूयात!
मी काम करताना राजकारण बाजूला ठेवलंय, तुम्हीही एकदा प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे?— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2021
रोहित पवारांनी ट्विट करत म्हणले आहे की, “अतुल भातखळकरजी आपला मुद्दा मला योग्य वाटतो,मात्र टेंडर काढलं म्हणजे लगेच पैसे खर्च झाले असं होत नाही. त्या टेंडरच्या कामाचं बील देणं याला किती वेळ लागतो, हे तुम्हाला माहीतच असेल! आमदार निवासाचं म्हणाल तर लांबून येणाऱ्या महाराष्ट्रातील आमदारांसाठी ते महत्वाचं आहे. तरीही मी टेंडर बाबत माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेन, असे आश्वासन देत तुम्हीही २२००० कोटींचा सेंट्रल विस्टा प्रकल्प आणि १३००० कोटींचं पंतप्रधान निवासस्थानाचं काम पुढं ढकलून लसीकरणाकडं लक्ष देण्यासाठी केंद्राकडं पाठपुरावा केला तर लसीकरणाबाबत आपल्या महाराष्ट्रावरील अन्याय दूर होईल, असे प्रतिउत्तर रोहित पवारांनी अतुल भातखळकरांना दिले.
मा. @BhatkhalkarA जी आपला मुद्दा मला योग्य वाटतो,पण टेंडर काढलं म्हणजे लगेच पैसे खर्च झाले असं नाही.टेंडर ते कामाचं बील देणं याला किती वेळ लागतो,हे तुम्हाला माहीतच असेल!आमदार निवासाचं म्हणाल तर लांबून येणाऱ्या आमदारांसाठी ते महत्वाचं आहे,तरीही मी याबाबत मा.मुख्यमंत्र्यांशी बोलेन. https://t.co/eovAroZ361
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2021
तसेच, सध्या राजकारण बाजूला ठेवून आपण लोकप्रतिनिधी म्हणून राज्यातील जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करूयात! मी काम करताना राजकारण बाजूला ठेवलंय, तुम्हीही एकदा प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे?, अशी विचारणाही रोहित पवार यांनी यावेळी केली आहे.