IMPIMP
Place us also in the cabinet expansion of the state Place us also in the cabinet expansion of the state

“राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही स्थान द्या”, सदाभाऊंची मोठी मागणी

मुंबई : महायुती सरकार अस्तित्वात येऊन अद्यापही मंत्रिमंडळाचा उर्वरित विस्तार झालेला नाहीय. यातच केंद्रात योग्य स्थान न मिळाल्याने शिंदे आणि अजित पवार गटाने नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता राज्य मंत्रीमंडळात घटकपक्षांना देखील सन्मान दिला पाहिजे. अशी मागणी रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांनी केलीय. तसेच आयाराम-गयारामांचे लाड किती परवावे ? याला काही निर्बंध गरजेचे आहे. असेही सदाभाऊ खोत म्हणाले. त्यावरून राज्यात महायुतीत हा संघर्ष आता अधिकच वाढत चालला आहे.

हेही वाचा..पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा..! मंत्रीपदाची शपथ अन् पहिल्याच दिवसापासून कामाला सुरुवात 

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झालेला आहे. अजूनही राज्यमंत्रीपदाच्या कारभाराची जबाबदारी अद्यापही कोणावरही सोपविण्यात आलेली नाहीय. अशातच आता येत्या काही आठवड्यात राज्यात मंत्रिमंडळाचा उर्वरित विस्तार होण्याची शक्यता आहे. त्या मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांना देखील सन्मान दिला पाहिजे. असं सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा…“लोकसभेसारखं विधानसभेच्या जागावाटपाचं गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालून नका,” भुजबळांनी आधीच सगळं केलं स्पष्ट 

या निवडणुकीत आयाराम-गयारामांचे लाड किती पुरवावे ? याला देखील निर्बंध असणे अत्यंत गरजेचे आहे. शेतमजूर, बाराबलुतेदार, यांचं प्रतिनिधित्व आम्ही देखील करत असतो. त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात घटक पक्षांना तो सन्मान देणे गरजेचे आहे. हे सर्व असचं सुरू राहिलं तर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील नैराश्य निर्माण होईल. असं होऊ नये म्हणून आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना देखील समजून घेतल्या पाहिजेत. असेही खोत यांनी सांगितले.

READ ALSO :

हेही वाचा..“सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनी “त्या” दोन अतृप्त आत्म्यांची शांती करायला हवी” 

हेही वाचा…कोण होणार लोकसभेचे अध्यक्ष ? आंध्र प्रदेशच्या ‘या’ महिलेची जोरदार चर्चा 

हेही वाचा..राज्यातील ‘सहा’ मंत्र्यांवर सोपविली विविध खात्याची जबाबदारी, वाचा सविस्तर 

हेही वाचा..राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी मोहोळांकडे सहकार खाते, भाजप नेतृत्वाची महाराष्ट्रात मोठी खेळी 

हेही वाचा…“बारामतीचा दादा आता बदलायला हवा, युगेंद्र पवारांना विधानसभेची उमेदवारी द्या,” शरद पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी