पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाउंट काही वेळासाठी हॅक झालं होतं. हे खातं त्यांच्या वैयक्तिक वेबसाइटवर जोडलं गेलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, या खात्यावर तब्बल 25 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हॅकरने खातं हॅक केल्यानंतर चक्क बिटकॉईनची मागणी केली.
यासंबंधी एक ट्विटही करण्यात आलं होतं. हॅकर्सनी ट्वीट करून पीएम नॅशनल रिलीफ फंडमध्ये क्रिप्टो चलनाद्वारे देणगी द्या असं लिहिलं गेलं होतं. पण त्यानंतर तात्काळ हे ट्वीट डिलीट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
हॅकर्सनी मोदींच्या ट्विटर अकाऊंटवर लिहलं की, ‘कोविड -19 साठी पंतप्रधान मोदी रिलीफ फंडामध्ये आपण दान करावे असं मी आपणास अपील करतो’. रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना ट्विटरनेही पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक वेबसाइटची लिंक अकाऊंट असल्याची कबुली दिली आहे