IMPIMP
Politics is not your business, so this is your situation Nilesh Rane's advice to Uddhav Thackeray Politics is not your business, so this is your situation Nilesh Rane's advice to Uddhav Thackeray

“राजकारण हे तुमचं काम नाही, म्हणून तुमची ही अवस्था”

मुंबई : कोकणात नेमलेल्या पदाधिकान्यांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेनेच्या प्रकाश रसाळ यांनी उपजिल्हाप्रमुख पदाचा कारभार स्विकारण्यास वैयक्तिक कारणास्तव नकार दिला आहे. तर युवा संघटक वैभव पाटील यांनी नेमणुकीच्या अवघ्या काही तासातच राजीनमा दिला आहे. यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे.

“मंत्रिमंडळाच्या निर्णयावर राऊतांचं बोट;” संविधानाचा दाखल देत केला सवाल 

निलेश राणे यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आता तरी ओळखा तुम्ही सगळ्यांनाच नकोसे झाला आहेत. फोटोग्राफी हा तुमचा छंद आहे,  तोच तुम्ही जोपासावा, राजकारण हे तुमचं काम नाही. वडिलांच्या जीवावर आयुष्य जगलात पण त्यांनी केलेलं कार्य टिकवता आलं नाही झाली आहे.  असं ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निलेश राणे यांनी शाब्दिक हल्ला चढावला आहे.

“काय तो पाऊस, काय तो पुर, काय ते खड्डे, सगळं ओके आहे;”भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर टोलेबाजी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अद्यापही काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शिवसेनेच्या बंडखोर आमदारानंतर आत्तापर्यंत शिवसेनेच्या अनेक जिल्हे, तालुका आणि महानगरपालिकांमधील कार्यकर्ते आणि पदाधीकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणुन शिंदे गटात जाणाऱ्या बंडखोरांची शिवसेनेतुन हाकलपट्टी सुरू आहे. त्यांच्या जागी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

“काय तो पाऊस, काय तो पुर, काय ते खड्डे, सगळं ओके आहे;”भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर टोलेबाजी 

काही दिवसांपूर्वीच शिवसेनेकडून रत्नागिरीतील आमदार उदय सामंत यांच्या समर्थकांची हकालपट्टी करण्यात आली होती. उदय सामंत यांचे समर्थक असणारे उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेटये आणि युवा तालुका अधिकारी तुषार साळवी यांना पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरीत नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेनेने शहर संघटक आणि महिला संघटक या पदांचीही नव्याने नियुक्ती केली होती. मात्र, नव्याने नियुक्ती केलेल्या प्रकाश रसाळ यांनी उपजिल्हाप्रमुख पदाचा कारभार स्विकारण्यास वैयक्तिक कारणास्तव नकार दिला आहे. तर युवा संघटक वैभव पाटील यांनी नेमनुकीच्या अवघ्या काही तासातच राजीनामे दिल्याने शिवसेनेत पढलेली फुट रोखण्यासाठी आता शिवसेना कोणती पावले उचलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे?

Read also